शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पाणीपुरवठा १५ मार्चपासून खंडित : सिंचन विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:06 IST

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणकडे तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा धोम पाठबंधारे विभागाचे उपअभियंता सुनील गोडसे यांनी दिला आहे. याबाबत जीवन प्राधिकरण विभागास नोटीसही बजावण्यात आली आहे. धोम पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनच्या अधिकार क्षेत्रातील कृष्णा नदीवरील क्षेत्र माहुली येथून सातारा शहर व उपनगरातील ग्राहकांसाठी (घरगुती वापरासाठी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाणी उपसा करण्यात येतो. या पाणी उपसासंबंधातील मासिक देयक बिले व त्यासंबंधीच्या सूचना वेळोवेळी जीवन प्राधिकरणाकडे सादर केली जात असताना देखील प्राधिकरणकडून मार्च २००६ पासून आजअखेर संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे प्राधिकरणकडे बिलाची एकूण रक्कम १ कोटी ५५ लाख ७६ हजार व समायोजनेची ६१ लाख ६९ हजार अशी मिळून तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे.याबाबत मार्च २००६ पासून आजपर्यंत वेळोवेळी सूचना देऊन व पत्रव्यवहार करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कोणतीही ठोस सकारात्मक कृती न केल्याने नाईलाजास्तव शहराचा पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. त्यानंतर निर्माण होणाºया जनप्रक्षोभास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा सर्वस्वी जबाबदार राहील, असेही नोटिसीत नमूद केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित सिंचन विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आल्याचेही धोम उपविभागीय पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे... तर सातबारावर थकबाकीचा बोजासंबंधित उपविभागाच्या अधिकार क्षेत्रातील भुर्इंज, शिवथर, सातारारोड व त्रिपुटी या शाखेतील शेती सिंचनाची एकूण २ कोटी १५ लाख २६ हजार रुपये थकबाकी येणे आहे. संबंधितांनी थकबाकीची रक्कम त्वरित अदा न केल्यास उन्हाळी हंगामात कालव्यात पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या सात बारावर थकबाकी रकमेचा बोजा चढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च, कर्मचाºयांचे वेतन व दैनंदिन प्रक्रिया खर्च तर दुसरीकडे थकबाकी रकमांचे वाढत जाणारे आकडे यांमुळे विभागाचा आर्थिक समतोल राखणे जिकिरीचे जात आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा परिणाम विभागाच्या कर्मचाºयांचे वेतन, कालव्याची देखभाल व दुरुस्तीवर होणारा आहे. थकबाकीदार शेतकºयांनी सिंचनाची देयके अदा न केल्यास उन्हाळी हंगामात कालव्यात पाणी सोडणे शक्य होणार नाही.- सुनील गोडसे, उपविभागीय अभियंता